आज दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात उपस्थित राहून सर्व पत्रकार बंधुंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी उपायुक्त प्रसाद शिंगटे, सिस्टम मॅनेजर राज घरत, माहिती व जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कांबळे व पत्रकार बंधू उपस्थित होते. #MarathiJournalistDay #PressDay #MiraBhayandarMunicipalCorporation #SanjayShripatraoKatkar #MediaFriends #MiraBhayandarMunicipalCorporationPressRoom
Mira Bhayandar Municipal Corporation
Government Administration
Mira Bhayandar, Maharashtra 640 followers
स्वच्छ, सुंदर मीरा भाईंदर
About us
With the amalgamation of five Gram Panchayats. Mira Bhainder Municipal Corporation was established on 12 June 1985, after which four Gram Panchayats namely Raimurdhe, Dongri, Uttan and Versova were incorporated on 23 January 1990. Around this municipality from Dahisar Checknakya directly Sanjay Gandhi National Park Vanrai, Ghodbunder Fort, Vasai Bay, Uttan, Gorai Beach is a total of 79.40 sq km. Mira Bhainder city is a city endowed with natural beauty in such an area.
- Website
-
http://www.mbmc.gov.in
External link for Mira Bhayandar Municipal Corporation
- Industry
- Government Administration
- Company size
- 5,001-10,000 employees
- Headquarters
- Mira Bhayandar, Maharashtra
- Type
- Government Agency
- Founded
- 1985
Locations
-
Primary
Mira Bhayandar, Maharashtra, IN
-
Chtrapati Shivaji Marg, Bhayandar West
Mira Bhayndar, Maharashtra, IN
Employees at Mira Bhayandar Municipal Corporation
Updates
-
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी, शहरातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त प्रसाद शिंगटे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, नगरसचिव वासुदेव शिरवळकर, शहर अभियंता दिपक खांबित, मुख्यलेखाधिकारी व वित्त अधिकारी कालिदास जाधव, सहाय्यक संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे व मुख्यलेखापरीक्षक सुधीर नाकाडी उपस्थित होते. #MiraBhayandarMunicipalCorporation #DevelopmentReviewMeeting #UrbanDevelopment #LeadershipInAction #CityGrowth #AdministrativeLeadership #SanjayShripatraoKatkar #MBMCAchievements #Teamwork #ProgressiveGovernance
-
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते आज दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी महापालिका शिक्षण विभाग आयोजित आंतर शालेय "कला-क्रीडा महोत्सव २०२५" चा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, खिलाडूवृत्ती वाढावी तसेच शारिरीक-मानसिक संतुलन निर्माण होऊन, सर्वांगीण विकास व्हावा यासाठी २०१५ पासून "कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, असे मा. आयुक्त यांनी सांगितले आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. यावेळी, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त (शिक्षण) प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित आणि महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. #KalaKridaMahotsav2025 #MBMCArtAndSports #ShapingYoungMinds #AllRoundDevelopment #InterschoolFestival #SportsmanshipMatters #CelebratingTalent #MBMCInitiatives #MiraBhayandarEvents #MBMCEducation #SportsForAll
-
+5
-
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या "Breathe Easy" अभियानांतर्गत "Development With Sustainability" या कार्यशाळेचे आयोजन मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. प्रदूषण, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यांसारख्या शहरी विकासाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची होती. यावेळी, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, शहर अभियंता दिपक खांबित, सहाय्यक संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, कार्यकारी अभियंता व आणि इतर सर्व अधिकारी, अभियंते, कंत्राटदार, विकासक आणि युटीलिटी सर्व्हिस प्रोव्हाइडर उपस्थित होते. #BreatheEasyMBMC #DevelopmentWithSustainability #MiraBhayandarRising #SustainableUrbanGrowth #PollutionFreeFuture #TrafficSolutions #SmartCityInitiative #CleanAndGreenMBMC #SustainabilityInAction
-
आज दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत मे. लहास ग्रीन इंडिया प्रा.लि. यांनी "टोव गो" या कचरा प्रक्रिया वाहनाचे प्रात्यक्षिक सादर केले. सदर वाहनाद्वारे प्रतिदिन १५०० ते १७०० किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता, स्वच्छता निरीक्षक व मे. लहास ग्रीन इंडिया प्रा.लि. प्रतिनिधी उपस्थित होते. #wastetechnology #wastetocompost #TwoGo #MBMCInitiatives #MaharashtraMissionUrban #MiraBhayandar
-
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी आज दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाच्या स्थितीचा आढावा पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, शहर अभियंता दिपक खांबित व कार्यकारी अभियंता नितीन मुकणे उपस्थित होते. #MBMCDevelopment #InfrastructureProgress #KalaDalanReview #UrbanDevelopment #CityProgress #LeadershipInAction #MBMCCares #CulturalInfrastructure #BuildingTheFuture #CommunityDevelopment #MBMC #MiraBhayandar
-
+1
-
"फराळ सखी" या उपक्रमाची दखल केंद्र सरकारच्या निती आयोगाने घेऊन उपक्रमाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी महिलांना प्रशिक्षित करून त्यांना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी नीती आयोगाच्या महिला उद्यम मंचातर्फे ‘अवॉर्ड टू रिवॉर्ड’ या मोहिमेचा मिरा भाईंदर महानगरपालिकेत आज दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘फराळ सखी’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उपक्रम यशस्वी ठरला आहे. #FaralSakhi #WomensEmpowerment #MBMCInnovates #MBMCInitiatives #MBMCUpdates #MBMC #MiraBhayandar
-
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी आज दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी महापालिका शाळा क्रमांक 32 याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. विविध विषयांना अनुसरून अडचणींबाबत मा. आयुक्त यांनी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (शिक्षण) प्रसाद शिंगटे आणि सहाय्यक आयुक्त दिपाली पवार उपस्थित होते. #RoadSafetyCampaign #DriverTraining #MBMCTransport #SafeDrivingInitiative #RoadSafetyFirst #MBMCCares #SkillDevelopment #CityTransportation #MBMC #MiraBhayandar
-
+1
-
आज दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या, वाहन चालक कर्मचारी प्रशिक्षण शिबिर केंद्राचे उद्घाटन मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाढत्या शहरिकरणामुळे वाहन चालकांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. यासाठीच महापालिकेने ४ दिवसीय सर्व स्तरीय प्रशिक्षण वाहन चालकांसाठी आयोजित केले आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन उपक्रम व्यवस्थापक अनिकेत मानोरकर, उपायुक्त (परिवहन) प्रसाद शिंगटे, सहाय्यक आयुक्त स्वप्निल सावंत, प्रशिक्षक व वाहन चालक उपस्थित होते. #RoadSafetyCampaign #DriverTraining #MBMCTransport #SafeDrivingInitiative #RoadSafetyFirst #MBMCCares #SkillDevelopment #CityTransportation #MBMC #MiraBhayandar
-
+2
-
चला, आजपासून सिंगल युज प्लास्टिकला नाही म्हणूया!🌱♻️ #SwachhSurvekshan2024 #MajhiVasundhara #Plasticfreecity #bansingleuseplastic #MissionLiFE #SwachhaBharat #ICleanMyCity #SwachhSurvekshan2024MBMC #swachhmaharashtramissionurban #PlasticFree #EcoFriendly