Jump to content

अलेस्सांद्रो व्होल्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलेस्सांद्रो व्होल्टा (फेब्रुवारी 18, इ.स. 1745 - इ.स. 1827 मार्च 5) इ.स.चे 1800 च्या दशक मध्ये बॅटरी शोध साठी प्रसिद्ध, एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होता.

अलेस्सांद्रो व्होल्टा

पूर्ण नावअलेस्सांद्रो ज्युसेप आंतोनिओ अनास्तासिओ व्होल्टा
(Alessandro Giuseppe Antonio Anastasio Volta)
जन्म फेब्रुवारी १८, १७४५
कोमो, लोंबार्डी, इटली
मृत्यू मार्च ५, १८२७
कोमो, लोंबार्डी, इटली
निवासस्थान इटली ध्वज इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
ख्याती विद्युतघटकाची (इलेक्ट्रिक बॅटरीची) निर्मिती

पहिलि ईलेक्त्रिक सेल: त्याच्या व्होल्टाइक ब्लॉकचि शोध घोषणा करताना, व्होल्टा ह्यांनी, विलियम निकोलसन याना मान देउन तिबेरिउस केवेलो, आणि अब्राहाम बेनेत च्या प्रभावाला अभिवादन दिले.

पूर्ण नाव - अलेस्सांद्रो ज्युसेप आंतोनिओ अनास्तासिओ व्होल्टा जन्म - फेब्रुवारी १८, १७४५ कोमो, लोंबार्डी, इटली मृत्यू - मार्च ५, १८२७ कोमो, लोंबार्डी, इटली निवासस्थान - इटली ध्वज इटली राष्ट्रीयत्व - इटली ध्वज इटली कार्यक्षेत्र - भौतिकशास्त्र ख्याती - विद्युतघटकाची (इलेक्ट्रिक बॅटरीची) निर्मिती

व्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. यातूनच मग पुढे ‘इलेक्ट्रोकेमिस्ट्री’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिझम’ यांच्यातले अनेक प्रयोग करणं शक्य झालं. एकूणच गॅलव्हिनीच्या संशोधनाचा सगळीकडे ‘जाता जाता’ उल्लेख केला जातो, तर व्होल्टाच्या कामगिरीचा वापर नंतर तारायंत्र (‘टेलिग्राफ’), दूरध्वनी (‘टेलिफोन’) आणि बिनतारी (‘वायरलेस’) या यंत्रणांच्या संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधनात होणार होता! विजेची निर्मिती त्या बेडकाच्या शरीरात होत नसून तिचा उगम दुसरीकडे होतो हे दाखवून देण्यासाठी त्यानं आता जंग जंग पछाडलं. त्यासाठी त्यानं एक उपकरण तयार केलं. त्यात चांदी आणि जस्ताच्या धातूचे बरेच तुकडे घेतले. या तुकडय़ांमध्ये त्यानं ओलसर कार्डबोर्डच्या तबकडय़ा बसवल्या आणि एका जिवंत बेडकाच्या शरीरातून त्या उपकरणाच्या साहाय्यानं वीज सोडली, तर तोही थरथरला. गंमत म्हणजे यात कुठेही लेडन जारचा (म्हणजे तत्कालीन बॅटरीचा) वापर नव्हता. याचाच अर्थ म्हणजे त्या जिवंत बेडकाच्या शरीरात कुठली तरी अगदी कमी ताकदीची वीज होती आणि जेव्हा जास्त ताकदीच्या बाहेरच्या धातूच्या बॅटरीसदृश उपकरणाला त्या प्राण्याचा थेट स्पर्श झाला तेव्हा ती बेडकाच्या शरीरातली वीज त्या सर्किटमधून गेली, आणि त्यामुळे त्याच्या पायांची थरथर झाली. यानंतर व्होल्टानं स्वतःवरही प्रयोग केले! त्यासाठी त्यानं आपल्या तोंडात एक चांदीचा चमचा धरला. मग आपल्या जिभेच्या पुढच्या टोकावर एक पत्र्याचा तुकडा ठेवला. मग त्यानं तो तुकडा मागे असलेल्या चमच्याला जोडताच त्याला एक घाणेरडा वास आला! याचं कारण म्हणजे हे दोघं एकमेकांना जोडले जाताच या दोन वेगवेगळ्या धातूंमधून वीज गेली आणि ती वासाच्या रूपानं बाहेर प्रकटली! म्हणजेच जिवंत किंवा मृत बेडकाचे पाय हलण्यामागचं कारण हे त्या बेडकाच्या शरीरात कुठलीही बॅटरी वगैरे नसून बाहेरच्या सर्किटला तो बेडूक चिकटला की तो बेडूकही त्याच सर्किटचा भाग होणं, आणि त्यामुळे त्याच्या शरीरातून वीज जाणं, आणि म्हणून तो थरथरणं हे असतं, असा अतिशय महत्त्वाचा निष्कर्ष त्यानं काढला. त्यामुळे ‘ॲनिमल इलेक्ट्रिसिटी’ वगैरे बंडल प्रकार असतात हे त्यानं दाखवून दिलं! दोन धातू जवळ आणले आणि त्यांच्यामध्ये ओलसरपणा असला की वीज तयार होते हे व्होल्टाच्या लक्षात आलं होतं. हा निष्कर्ष सनसनाटीच होता. यातच तर आपण आजही वापरत असलेल्या ‘बॅटरी’चीही मूळं होती! त्याच्या या निष्कर्षांमुळे इटलीतल्या सगळ्या बेडकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल! गॅलव्हिनीचा या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर एका वर्षांनं, म्हणजे २० मार्च १८०० या दिवशी व्होल्टानं लंडनच्या मानाच्या ‘द रॉयर सोसायटी’चे सचिव सर जोसेफ बँक्स यांना पत्र लिहून आपल्या गॅलव्हिनीबरोबरच्या वादावर कायमचा पडदा टाकण्यात आपल्याला यश आल्याचं कळवलं. त्यासाठी आपल्या उपकरणात ठराविक पदार्थ विशिष्ट रचनाक्रमानं मांडून त्यांच्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात आपल्याला यश मिळालेलं असून प्राण्यांच्या शरीरात वीज तयार होते वगैरे सगळं बकवास असल्याचा त्यानं दावा केला. अर्थातच व्होल्टाचं मत अर्धवट प्रमाणात बरोबर असणार होतं. त्यानं तयार केलेल्या त्या काळात ‘व्होल्टाईक पाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपकरणालाच आपण आज सगळीकडे वापरत असलेली बॅटरी म्हणून ओळखतो.

  翻译: