Jump to content

सॅम्युअल कॉल्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॅम्युअल कॉल्ट

सॅम्युअल कॉल्ट (जुलै १९, इ.स. १८१४:हार्टफर्ड, कनेटिकट - जानेवारी १०, इ.स. १८६२) हा अमेरिकन संशोधक होता. त्याने रिव्होल्व्हर पिस्तुलचा शोध लावला.

कॉल्टने अगदी लहानपणी त्याच्या वडिलांच्या कापडगिरणीतील यंत्रे पाहिली होती व ती कशी चालतात याचा अभ्यास केला होता. वयाच्या १५व्या वर्षी त्याने घर सोडले व भारताला जाणाऱ्या जहाजावर तो खलाशी झाला. अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आली.

इ.स. १८३५मध्ये त्याने आपल्या या कल्पनेचा युरोपीय पेटंट घेतला व पुढील वर्षी अमेरिकन पेटंटही मिळवला. मार्च ५, इ.स. १८३६ रोजी त्याने पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल पॅटरसन, न्यूजर्सी येथे तयार केले परंतु अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही व कॉल्टच्या कंपनीने इ.स. १८४२मध्ये दिवाळे काढले. इ.स. १८४६ पर्यंत त्याने नवीन पिस्तुले तयार केली नाहीत.

इ.स. १८४७मध्ये त्याने पुन्हा उत्पादन सुरू केले व स्वतः सगळे (कच्चा माल घेण्यापासून तयार पिस्तुले विकण्यापर्यंत) करण्याऐवजी त्याने पगारदार मदतनीस घेतले. यानंतर लवकरच अमेरिकन सरकारने त्याच्याकडून पिस्तुले विकत घेण्यास सुरुवात केली. यानंतर कॉल्ट व त्याच्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही व आत्तापर्यंत कोट्यावधी पिस्तुले विकली आहेत.

  翻译: