Jump to content

हिरोडोटस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉडरम या जन्मगावी असलेला हिरोडोटसचा पुतळा

हिरोडोटस हा एक ग्रीक इतिहासकार होता.

परिचय

[संपादन]

इ.स. पूर्व 484 मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, तुर्की) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. हिरोडोटसने इजिप्त, थ्रेस, सिथीया, बॉबी, व लोनिया या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील राजकीय व सामाजिक बदल पाहिले व हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने ग्रीक-पर्शियन युद्धाचे वर्णन, तेथील भौगोलिक स्थळाचे वर्णन, घटनांचा क्रम व तारखा दिलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात सारस राजापासून कॅम्बे राजा दराफस याच्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांची माहिती आहे. दुसऱ्या भागात झेरेक्सिस राजाची माहिती आहे तर तिस-या भागात ग्रीक आणि पर्शियन युद्धाचे वर्णन आहे. इ.स. पूर्व ४३० मध्ये हिरोडोटसचे इटलीतील ग्रीक वसाहत ब्युरो येथे निधन झाले.

इतिहास लेखनाला दिशा

[संपादन]

हिरोडोटसने इतिहास शास्त्र स्वरूपात मांडण्याची प्रथा सुरू केली. त्याने इतिहासाला नीतिशास्त्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा कोणत्याही धर्माशी कोणत्याही देवाशी संबंध नसून त्याचा संबंध मानवाशी आहे हे दाखवून दिले. त्याने पुढील काळातील इतिहास संशोधकांसाठी ऐतिहासिक घटना मानवी जीवनाशी संबंधित असाव्यात असा निकष लावून दिला. ऐतिहासिक साधनांवर इतिहासाचे लेखन करावयाचे असते हे त्याने दाखवून दिले.

  翻译: