Google Wallet हे तुम्हाला तुमच्या आवश्यक गोष्टींचा जलद, सुरक्षित अॅक्सेस देते. फ्लाइट बोर्ड करा, चित्रपट पाहण्यास जा, तुमच्या पसंतीच्या दुकानांमध्ये रिवॉर्ड कमवा आणि आणखी बरेच काही करा - सर्व काही तुमचा Android फोन वापरून. तुम्ही ऑफलाइन असलात, तरीही सर्व काही एकाच ठिकाणी संरक्षित ठेवा.
सोयीस्कर
तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी जलद मिळवा
• तुमच्या दररोजच्या आवश्यक गोष्टी अॅक्सेस करण्याचे तीन झटपट मार्ग: जलद अॅक्सेससाठी तुमच्या फोनची क्विक सेटिंग्ज वापरा, तुमच्या होमस्क्रीनवरून Wallet अॅप उघडा किंवा तुम्ही काम करण्यात व्यस्त असल्यास Google Assistant वापरा.
कार्ड, तिकिटे, पास आणि आणखी बरेच काही सोबत ठेवा
• बरेच काही सोबत ठेवणारे डिजिटल वॉलेट वापरून फ्लाइट बोर्ड करा, कॉन्सर्ट पहा किंवा तुमच्या पसंतीच्या दुकानांमध्ये रिवॉर्ड कमवा
तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी, तुम्हाला आवश्यक असतील तेव्हा
• तुमचे Wallet हे तुम्हाला कोणती गोष्ट कधी आवश्यक आहे हे सूचित करू शकते. प्रवासाच्या दिवशी तुमच्या बोर्डिंग पासविषयी सूचना मिळवा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा तुमच्या बॅगमध्ये शोधावे लागणार नाही.
उपयुक्त
संपूर्ण Google वर अखंड इंटिग्रेशन
• फ्लाइट अपडेट आणि इव्हेंटशी संबंधित सूचना यासारख्या नवीनतम माहितीसह तुमचे Calendar व Assistant अप टू डेट ठेवण्यासाठी तुमचे Wallet सिंक करा
• Maps, Shopping आणि आणखी बऱ्याच ठिकाणी तुमची पॉइंट शिल्लक व लॉयल्टीचे फायदे पाहून आणखी स्मार्ट पद्धतीने खरेदी करा
लगेच सुरुवात करा
• कार्ड, बोर्डिंग पास, लॉयल्टी कार्ड आणि तुम्ही Gmail वर सेव्ह केलेल्या आणखी बऱ्याच गोष्टी इंपोर्ट करता येत असल्यामुळे सेट करणे सोपे आहे.
फिरतीवर असताना गोष्टींबद्दल माहिती मिळवत रहा
• Google Search वरून मिळवलेल्या नवीन माहितीसह फ्लाइट बोर्ड करणे खूप सोपे करा. Google Wallet हे गेट बदलणे किंवा फ्लाइटला अनपेक्षित उशीर होणे यांबद्दल तुम्हाला पोस्ट करत राहू शकते.
सुरक्षित आणि खाजगी
सर्व काही सोबत ठेवण्याचा सुरक्षित मार्ग
• तुमच्या सर्व आवश्यक गोष्टी संरक्षित ठेवण्यासाठी Google Wallet चा प्रत्येक भाग सुरक्षित आणि खाजगी पद्धतीने तयार केला आहे.
तुम्ही विश्वास ठेवू शकता अशी Android सुरक्षा
• २ टप्पी पडताळणी, Find My Phone आणि रिमोट पद्धतीने डेटा मिटवणे यांसारख्या Android च्या प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह तुमचा डेटा व आवश्यक गोष्टी सुरक्षित ठेवा.
तुमचा डेटा तुम्हीच नियंत्रित करता
• वापरण्यास सोपी अशी गोपनीयता नियंत्रणे तुमच्याकरिता अनुकूल केलेल्या अनुभवासाठी, संपूर्ण Google उत्पादनांवर माहिती शेअर करण्याची निवड करण्याची अनुमती देतात.
Google Wallet हे सर्व Android फोन (Pie 9.0+) उपलब्ध आहे.
तरीही प्रश्न आहेत का? support.google.com/wallet वर जा.
या रोजी अपडेट केले
१२ डिसें, २०२४