एका (आंतरराष्ट्रीय ) लग्नाची गोष्ट !
दोन मित्र आबूराव आणी बाबूराव यांच्यामधील ही बतावणी:
आबूराव: नमस्कार बाबूराव, कसे आहात?
बाबूराव: मी मजेत आहे. अहो पण तुम्ही होता कुठे गेले काही दिवस? दिसला नाहीत.
आबूराव: अहो, आमच्या पाहुण्यांच्या म्हणजे सुरेश बंबानींच्या मुलाचं वसंताचं लग्न होतं, त्याची जबाबदारी सांभाळत होतो.
बाबूराव: काय सांगता? अहो, मी पण त्याच लग्नात मुलीकडून म्हणजे सारीका अर्जंटसाठी संगीत समारंभाची जबाबदारी सांभाळत होतो. ती माझ्या मेव्हण्याच्या साडूची भाची आहे. पण मग मला तुम्ही दिसला कसे नाही लग्नात?
आबूराव: अहो, मला तयारीमध्ये श्वास सुध्दा घ्यायला वेळ नव्हता. सगळ्या नट नट्यांच स्वागत मीच करत होतो. त्या प्रसिद्ध नटीच्या मागच्या गर्दीतलं तिसरं डोकं दिसतंय ना तो मी आहे.
बाबूराव: अहो माझी पण किती धावपळ झाली सगळ्यांची डान्सची तयारी करून घेताना. वसंता तब्येतीने सुदृढ असल्यामुळे बरा नाचला, पण आमची सारीका कशी छान नाचली, मी शिकवल्याप्रमाणे.
आबूराव: हे मात्र अती होतंय बाबूराव. तुमच्या थापा ऐकून मला पंचतंत्रामधील बेडकाची गोष्ट आठवली.
बाबूराव: कोणती गोष्ट? मला पण सांगा की.
आबूराव: सांगतो. एका गावात एक बेडूक त्याच्या पिल्लासोबत रहात असतो. एकदा त्याच्या पिल्लाला एक मोठा बैल दिसतो. त्यामुळे घाबरून ते पिल्लू लगेच त्याच्या बाबांकडे जातं. आपल्या पिल्लासमोर बढाई मारण्यासाठी बेडूक आपलं पोट फुगवून सांगतो की तो प्राणी त्याच्यापेक्षा मोठा नसेल. पण पिल्लू म्हणतं की तो प्राणी अजून मोठा होता. मग तो बेडूक आपलं पोट आणखी फुगवत जातो आणी शेवटी त्याचं पोट फुटून जातं.
बाबूराव: अगदी योग्य गोष्ट सांगीतलीत आबूराव तुम्ही. बाकीच्यांचे social media वरचे व्हिडिओ बघून मी तुम्हाला थाप मारली. एवढ्या मोठ्या लग्नात बंबानी आपल्याला कशाला बोलवतील म्हणा. मी खरं तर अमरनाथच्या लग्नाला गेलो होतो लातूरला. जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता. लाडू पण एकदम छान होते.
आबूराव: अहो आणी मी सुध्दा तुषारच्या लग्नाला गेलो होतो. आपण आपलं अंथरुण पाहून पाय पसरलेले बरे. चला, निघतो आता मी. बायकोने आळू आणायला सांगीतलं आहे. ती आज आळूचं फदफदं करणार आहे.
बाबूराव: वा! मजा आहे मग तुमची. चला भेटूया परत, रामराम.
मतितार्थ (Moral of the story): माणसाने फार थापा मारू नयेत, सॅलरी वाढण्याच्या आधी सुध्दा आणी नंतर सुध्दा 😊
PMTantra - Wisdom through Stories!
Senior Portfolio Consultant | Senior Project Manager at Persistent Systems | SPC | SAFe Agilists | Certified Associate CMMI 3.0 | ISO 9001:2015 Lead Auditor
5mohaha 😁
Technical Project Manager at Persistent Systems
5moसमझने वाले को इशारा काफी है 😂