मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते आज दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी महापालिका शिक्षण विभाग आयोजित आंतर शालेय "कला-क्रीडा महोत्सव २०२५" चा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, खिलाडूवृत्ती वाढावी तसेच शारिरीक-मानसिक संतुलन निर्माण होऊन, सर्वांगीण विकास व्हावा यासाठी २०१५ पासून "कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, असे मा. आयुक्त यांनी सांगितले आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. यावेळी, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त (शिक्षण) प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित आणि महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. #KalaKridaMahotsav2025 #MBMCArtAndSports #ShapingYoungMinds #AllRoundDevelopment #InterschoolFestival #SportsmanshipMatters #CelebratingTalent #MBMCInitiatives #MiraBhayandarEvents #MBMCEducation #SportsForAll
-
+5